वाल्मीक कराड नंतर विष्णू चाटेचा दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व व्हिडिओ पोलिसांच्या हाती.पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच देशमुख हत्या यांचे अपहरहन करून हत्या करण्यात आली होती.ही हत्या खंडणी प्रकरणमुळे झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.
या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सह इतर आरोपी बीड जिल्हा कारागृहात असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.
वाल्मीक कराडने या गुन्ह्यात दोषमुक्त करण्यात यावे असा अर्ज न्यायालयात केला होता,परंतु बीड न्यायालयाने वाल्मीक कराडचा अर्ज फेटाळला होता,यानंतर यातील आरोपी विष्णू चाटे याने देखील दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे केला होता.यावर बीड जिल्हा व सत्र न्यायालयात आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान देशमुख हत्या प्रकरनातील आरोपी विष्णू चाटे यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा (Discharge) अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या खटल्यातील पुढील कार्यवाहीसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विष्णू चाटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरणात पुराव्यांवर आधारित चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीच्या टप्प्यात विष्णू चाटे यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात, प्रकरणात पुरेसे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब उपलब्ध असल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे विष्णू चाटे यांच्यावर आरोप कायम ठेवण्यात आले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी होणार असून वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्ती बाबत देखील न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.
या निर्णयानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या हत्या प्रकरणाची बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोठी चर्चा सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व व्हिडिओ पोलिसांच हाती लागले असून हा पुरावा भक्कम समजला जात आहे.हे सर्व व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करणार असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.





