एकनाथ शिंदेंनी दिला बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात.
शेकडो शेतकऱ्यांना मदत किटचे वाटप."मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण"- राजेश कदम

बीड(प्रतिनिधी)– अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतकरी व नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या भीषण परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरणा मानत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि संसद रत्न खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.
शिवसेना कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सिंदफना नदीकाठच्या पूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना मदत कीट वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याचे कार्य करण्यात आले. या वेळी ठाणे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले की, “मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा हात पुढे केला आहे.”
मदत वाटप कार्यक्रमापूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पंचक्रोशीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली नगरसेवक राजन मराठे, नगरसेवक अंबरनाथ सुभाष साळुंखे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे, संजय निकते आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बीड कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शामसुंदर पडुळे, शिवसेना, युवासेना, व्हीजेएनटी सेना, शेतकरी सेना व एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे शिवसेनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आपले सामाजिक बांधिलकीचे धोरण अधोरेखित केले.





