शाळा,कॉलेज व कॉफी सेंटर परिसरात टवाळक्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई.
१४ टवाळखोर पोलिसांच्या ताब्यात.पो.नि.शितल कुमार बल्लाळ ॲक्शन मोडवर.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील शाळा,कॉलेज आणि कॉफी सेंटर परिसरात विनाकारण गोंधळ घालणारे व टवाळक्या करणाऱ्या १४ तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या टीमने ही कारवाई केली. परिसरात टवाळक्या करणाऱ्या १४ तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना समज देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बीड शहरातील शाळा,कॉलेज,क्लासेस व कॉफी सेंटर परिसरात विनाकारण गोंधळ घालणारे आणि टवाळक्या करणाऱ्यांवर पोलिसांचा विशेष लक्ष असून रस्त्यावर धिंगाणा, मस्ती करणाऱ्या टवाळखोरावर कारवाई करण्यात येईल असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सांगितले.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत चौका/चौकात, कॉलेज कोचिंग क्लासेसच्या जवळ टवाळखोर बसत असुन त्याकडे शिवाजीनगर पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.
यामुळे शिवाजी नगर,पेठ बीड व ग्रामीन पोलीस ठाणे प्रमुखांनी देखील आपल्या हद्दीतील शाळा, कॉलेज,कोचिंग क्लासेस परिसरात पेट्रोलिंग वाढवून रस्त्यावर टोळक्या करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.





