ब्रेकिंग न्यूज

अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या पोकलेन,हायवा जप्त.

नायब तहसिलदार जाधवर यांची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील काही डोंगर भागाचे विनापरवाना उत्खनन करून मुरुम माफियानी अक्षरशा चाळणी केली आहे याकडे तलाठी,महसूल अधिकारी, स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. अवैध मुरूम उत्खनन होत असल्याने शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्यात दरोडा पडत आहे. यासाठी बीड जिल्हाधिकारी व महसूल विभागाने पथक नेमणूक करून विनापरवाना मुरूम उत्खननान व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.

   बीड महसूल विभागाने घाटसावळी शिवारात अवैध मुरूम उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली असता विनापरवाना मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एक पोकलेन, एक हायवा आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी कंपनीसह चालक व मालकांविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना घाटसावळी येथे अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७:३० वाजता मिळाली. त्यानुसार त्यांनी अव्वल कारकून महादेव चौरे, ग्राम महसूल अधिकारी नितीन पोपळे,एम.एस. आखाडे, घाटसावळीचे मंडळ अधिकारी सतिष बांगर, नाळवंडीचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम आंधळे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोउपनि ए.सी. गोलवाल आणि पो एस.बी. बांगर यांना सोबत घेत संबंधित ठिकाणी गेले असता पथकाला पाहताच पोकलेनचा चालक पळून गेला, तपासणीमध्ये हायवामध्ये साधारण चार ते साडेचार ब्रास मुरूम भरलेला आढळला. हायवा ट्रक पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या फिर्यादीवरुन हायवा चालक इरशाद शेख, हायवाचा मालक अशोक भिंगले (रा. बेलखंडी, पाटोदा), पोकलेन मशीनचा अज्ञात चालक व मालक आणि ए.के.शिवहरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button