ढाका कुटुंबीयांनी घेतली पोलीस अधीक्षकांची घेतलीं भेट.
यशच्या खुनातील सर्व आरोपींना ताब्यात घेतले जाईल...नवनीत कॉवत.

बीड (प्रतिनिधी) बीड बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात यश ढाका वय वर्ष 22 या तरुणाची शुल्लक कारणावरून दिनांक 25 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजता टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती.
पत्रकाराच्या मुलाचा माने कॉम्प्लेक्स भागात गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर सहा ते आठ जणांनी यश ढाका यांच्या पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेने बीड शहर हादरले.यश ढाका याचा खून करण्यात आलेला एक आरोपी सूरज काटे याने स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता.इतर दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपी शोध पोलीस घेत आहेत.या हत्येतील इतर आरोपीचा शोध घ्यावा यासाठी आज पोलीस अधीक्षक यांची भेट ढाका कुटुंबीयांनी घेतली.
लवकर सर्व आरोपींना अटक करण्यात येईल : पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत .
पोलीस अधीक्षकानी ढाका कुटुंबीयांना आश्वासन दिले की लवकरच या खुनातील इतर आरोपींना ताब्यात घेतली जाईल, कोणत्याही आरोपीला अभय दिले जाणार नाही, जे आरोपी कोणात सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर शासन करण्यात येईल.





