ब्रेकिंग न्यूज

यश ढाकाच्या हत्येतील आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात.   

पत्रकाराच्या मुलाची हत्याने खळबळ,इतर आरोपीचा शोध सुरू

बीड दि. (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, मारामाऱ्या व खूनाचे सत्र काही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आवाहन बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासमोर आहे.

      पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात शुल्लक कारणावरून दि. 25 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टोळक्यातील एकाने चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी सुरज काटे याला पोलिसांनी अर्ध्या तासात जेरबंद केले. रविवारी या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.हत्या झाल्यानंतर सुरज काटे हा स्वतःहूून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

 रविवारी रात्री सोमनाथ काटे याला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कर्मचाऱ्यांनी बीड जालना रोडवरील पाडळशिंगी येथे ताब्यात घेतले. सोमनाथ काटेला बीड न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

या खुनातील पोलिस इतर आरोपीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत यामध्ये सुरज काटे, सोमनाथ काटे, निखील घोडके, कृष्णा सोनवणे यांच्यावर खुनाचा गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोरांची टोळी गजबजलेल्या ठिकाणी माने कॉम्प्लेक्स परिसरात दहशत माजवताना दिसते आहे. सुरुवातीला सुरज काटे घटनास्थळी येताच चाकू काढल्याने यश ढाका आणि त्याच्यासोबत ची मुले पळ काढताना दिसतात पण या दरम्यान सुरेश काटे यश ढाकाला पकडतो आणि रस्त्याच्या कडेला आणतो त्यानंतर तो जवळ बाळगलेला चाकूने यशाच्या छातीत घुसवतो. पोटात खोलवर घाव असल्याने यश ढाका काही क्षणात जमिनीवर कोसळतो,अति रक्तस्त्राव झाल्याने यशाचा पाच मिनिटात जागीच मृत्यू होतो.पत्रकार पुत्राच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सकाळी या हत्येतील सर्व आरोपीना अटक करावी या मागणीसाठी प्रेत ताब्यात घेण्यास नकार करत शवविच्छेदन ग्रहासमोर रस्ता रोको करण्यात आला होता.या हत्येतील आरोपींना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करतो असे आश्वासन दिल्याने नातेवाईक रस्त्यावरून उठवले होते.

 यशला चाकूने वार करत असताना काटेच्या मित्रांनी किंवा येणाऱ्या जाणाऱ्यानि काटेला अडवण्याचा,रोखण्याचा प्रयत्न केला असता तर यशाचा प्राण वाचला असता.

    या हत्येतील इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button