बीड शहर हद्दीतील हॉटेल,टपरी चालकांना पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी केल्या सूचना.
हॉटेल,कॉफी शॉप,टपरी वेळेतच बंद करा,अन्यथा कारवाई: पो.नि.शीतलकुमार बल्लाळ.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता बीड पोलीस प्रशासन तत्पर आहे.
सध्या बीड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून ते नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कावंत व पोलीस उप अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी आज सकाळी बीड शहर हद्दीतील हॉटेल व टपरी चालकांना ठाण्यात बोलावून नियमांचे पालन करण्या बाबत महत्त्वाचया सूचना केल्या जसे की हॉटेल किंवा पान टपरी रात्री ठरवून दिलेल्या वेळेतच बंद करणे गुटखाबंदी असल्याने गुटखा विक्री करू नये जर कुठ काही संशयास्पद हालचाल दिसली तर पोलिसांना त्या बाबत माहिती देणे या पुढे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल इत्यादी आवश्यक सूचना देण्यात आल्या असून यावेळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.हॉटेल,टपरी,कॉफी शॉप,बिर्याणी हाऊस हे वेळेतच बंद करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे शहर पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी सांगितले.





