ब्रेकिंग न्यूज
यश ढाकाच्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल !
माने कॉम्प्लेक्स परिसरात गजबजलेल्या ठिकाणी केली हत्या.

बीड (प्रतिनिधी) बीड बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात यश ढाका वय वर्ष 22 या तरुणाची शुल्लक कारणावरून दिनांक 25 सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजता हत्या करण्यात आली होती.
माने कॉम्प्लेक्स भागात गजबजलेल्या ठिकाणी , लोकांसमोर सहा ते आठ जणांनी यश ढाका यांच्या पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती या घटनेने बीड शहर हादरले.यश ढाका याचा खून करण्यात आलेला एक आरोपी सूरज काटे याने स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. व इतर आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यश ढाका याची हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.





