बीड जिल्ह्यात पूर परिस्थिती,दगडी पूल वाहतुकीसाठी बंद.
बिंदूसरेचे रौद्र रूप पाहा,जिल्ह्यात रेड अलर्ट जारी.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आज दिवसभर सुरू राहिला. ढगांच्या गडगडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बिंदुसरा नदी उफाळून वाहत आहे, तर मांजरा, माजलगाव आणि सिंदफणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
पासूनच पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील बाजार तळ तुला खालून अति वेगाने पाणी वाहत आहे, त्या पुलावर लहान मुलासह नागरिक फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी जमा झाल्याची दिसत होते, पुलावर थांबण्यात नागरिकांना मज्जा करावा यासाठी पेठ बीड पोलीस कर्मचारी तैनात करावे.
बीड शहरातील लक्ष्मण नगर, मोमीनपुरा, धांडे नगर, प्रकाश आंबेडकर नगर, जालना रोड या भागांमध्ये अनेक ठिकाणी घरामध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्याचे नुकसान झाले.
आमदार संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम हे गुडघ्याएवढ्या पाण्यातून शहरातील विविध भागात मदत करण्यासाठी फिरत आहेत. बीड शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याने बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत आज पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी हातात छत्री घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी जुना बाजार येथे भेट देऊन दगडी पुलावरून जात असलेल्या पाण्याची व उघड्या डि.पी.ची पाहणी केली. दगडी फुल वाहतुकीसाठी दोन दिवसापासून बंद करण्यात आला होता.बीड अग्निशामक दलाचे अधिकारी जाधव व कर्मचारी हे रात्रीपासूनच बीड शहरातील नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.
बीड प्रशासन कडून नागरिकांना आवाहन :
धोकादायक भागात जाणे टाळावे., पुर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे., वीजा पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक पुरपरिस्थितीत अनावश्यक पर्यटन नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात अफवांवर विश्वास ठेवू नका. निवारा केंद्राचा सहाय्य घ्यावे. टाळावे. पुरपरिस्थितीत नदी असताना, रस्ता ओलांडु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





