पावसाचा कहर ! पोलीस ठाण्यात घुसले पाणी;शस्त्रसाठा इतर साहित्य पाण्याखाली.
पोलीस ठाण्यातील पाणी विद्युत मोटर लावून बाहेर काढले जात आहे.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील बाजारतळ पुलाला पाणी लागत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी घुसल्याने शस्त्रसाठा व यंत्रसामग्री पाण्याखाली गेली आहे. पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येही पाणी साचले आहे.
पोलिस ठाण्याचे पाणी बाहेर काढण्यासाठी विद्युत मोटर वापरल्या जात असल्या तरी पाणी कमी होत नाही. पोलीस ठाण्यातील सर्व खोल्यांमध्ये पाणी तसेच ठाण्यात येण्यासाठी कीडच्या बाहेर पाणी साचल्याने पोलिस ठाण्याला तळ्याचे स्वरूप आले आहे
बीड नगरपालिकेकडून पोलीस ठाण्यासमोरील नाल्यांची साफसफाई न झाल्याने पोलीस ठाण्यातील खोल्यांमध्ये पाणी च पाणी झाले आहे.ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाच पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागत आहे.
पुन्हा बीड शहराला सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने पोलीस ठाण्यातील पाणी बाहेर काढताना पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पोलीस ठाण्यातील शस्त्रसाठा, कॉम्प्युटर व इतर साहित्य पाण्याखाली गेल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठे अडचणींना सामना करावा लागत आहे.





