गोट्या गित्तेवर पुन्हा मोक्का !
मकोका लावला मग अटक कधी ? गोट्या गीते वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला बसाव म्हणून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यावर मकोका अंतर्गत अनेक गुंडांवर कारवाया केल्या आहेत.
परळीतील सहदेव सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेवर धमकावणे,हाणामारी,खून यासह अनेक कलमा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याने बीड पोलीसानी मकोका अंतर्गत कारवाई केली होती. संघटित गुन्हेगारी टोळी असल्याने गोट्या गीते सह इतर सात जनावर मकोका लावण्यात आल्याने तो फरार असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मागील आठवड्यात गोट्या गीते सह पाच जनावरील मकोका रद्द करण्यात आला होता.गोट्या गीतेस हा फरार असताना त्याने मी निर्दोष असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते तसेच राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांना धमकी देखील दिली होती.सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गोट्या गीतेवरील मकोका मधून नाव वगळण्यात आल्याने पोलिसावर सडकून टीका केली होती.
गोट्या गीतेची पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराडचा राईट हॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोट्या गित्तेवरील मोक्का ६ दिवसांपुर्वी रद्द झाला होता. अप्पर पोलीस महासंचालकांनी ही कारवाई रद्द केली होती. गोट्या गित्तेवर बीडसह पुणे व राज्याच्या इतर भागात एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून बीड पोलिस गोट्या गीतेला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे.





