गोट्या गीतेवरील मकोका रद्द !
गोट्या गीते वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड,वाल्मीक कराडचा मकोका रद्द होणार ?

बीड पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारावर व गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदगौळ या गावातील गोट्या गीतेचे मूळ गाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होते. गोट्या गीते हा वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने दोन महिन्यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.गोट्या गीते सह सात जनावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने तो फरार होता, तो पोलिसाच्या हाती न लागल्याने पोलिसाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते परंतु त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून मी निर्दोष असल्याचे सांगितले होते.
गोट्या गीतेसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) पोलिस महासंचालकांनी रद्द केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गोट्या गीते हा परळी परिसरातील कुख्यात नाव असून त्याच्यावर मारामारी, अपहरण, खून यांसारखे गंभीर गुन्हे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल आहेत. सहदेव सातभाई खून प्रकरणानंतर त्याच्यावर मकोका (गुन्हेगारी प्रतिबंधक कारवाई) करण्यात आली होती.गोट्या गीतेसह सात आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई झाली होती.
पोलिस महासंचालकांनी या सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला. यामध्ये गोट्या गीतेचेही नाव आहे. परिणामी आता राजकीय वर्तुळात “वाल्मीक कराडवरील मकोका देखील रद्द होणार का?” अशी चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिक स्तरावर या निर्णयामुळे कराड समर्थक गटात आनंदाचे वातावरण असून विरोधक मात्र पोलिसांच्या या पावलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही मकोका रद्द झाल्याने कायद्याची धाकदपटशाही संपुष्टात येते का, असा सवाल सामान्य नागरिकांतून केला जात आहे.







