वाल्मीक कराडसह इतर आरोपी बाबद ॲड.उज्वल निकम काय म्हणाले पहा !
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला.

बीड(प्रतिनिधी)बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी वकील ॲड.उज्वल निकम व आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद झाला.
एडवोकेट उज्वल निकम म्हणाले : न्यायालयामध्ये आम्ही गंभीर स्वरूपाची तक्रार केली या आरोपीं कडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल केले जात आहेत आणि त्यामुळे या खटल्याची सुनावणी पद्धतशीरपणे लांबवली जात असल्याचे सांगण्यात आले.
न्यायालयाने स्पष्ट केलं की काही आरोपींनी दोष मुक्तीसाठी अर्ज दिले आहेत त्याकरता आम्ही त्यांच्या अर्जाची ही सुनावणी घेणार आहोत
तीन ते सात नंबरचे जे आरोपी आहेत त्यांच्या वकिलांच्या वतीने वतीने युक्तिवाद करण्यात आला. एकत्रीत आरोप पत्र जे सीआयडीने दाखल केले आहे ते चुकीचे आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही हा अधिकार फक्त न्यायालयाला असल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं
यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालय आणि कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा निकालाचा संदर्भ आधार म्हणून न्यायालयाला दिला
त्यानुसार न्यायालयाने तीन ते सात नंबरच्या आरोपीच्या अर्जासंदर्भात सुनावणी 24 तारखेला ठेवण्यात आली आहे
वाल्मीक कराडच्या वकिलाने न्यायालयात व्यक्तिवाद केला त्यांनी उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाच्या विरोधात आव्हान दिले आहे. आणि त्याकरता मी सांगितलं की उच्च न्यायालयाने यांना कुठेही स्टे दिला नाही त्याच्या विरुद्ध देखील आरोपी निश्चिती करणे जरुरी आहे.तरी आरोपी चार्ज फ्रेम होत नाही म्हणून 24 तारखेला तीन ते सात आरोपींच्या अर्जासंदर्भात निर्णय निर्णय दिल्यानंतर पुढील कामकाज होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने कुठलीही नोटीस दिलेली नाही फक्त सरकारला त्यांचं म्हणणं याबाबत त्याची सुनावणी 19 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे आहे मात्र न्यायालयापुढे आम्ही हे स्पष्ट केलं. देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 24 सप्टेंबर रोजी होणार असून न्यायालय काय अधिकार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




